मनोज जरांगे यांचे काही वेळातच सोलापुरात होणार आगमन

छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात सध्या काय सुरू आहे ?

मनोज जरांगे यांचे काही वेळातच सोलापुरात होणार आगमन

सोलापूर : प्रतिनिधी 

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांचे सोलापुरात सभेच्या ठिकाणी काही वेळातच आगमन होणार आहे. दरम्यान छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाज आंदोलक मोठ्या प्रमाणावर एकत्र झाले आहेत. 

सरस्वती चौक, छत्रपती श्री संभाजी महाराज चौक, चौपाड, सम्राट चौक, बाळीवेस अशा सर्व बाजूंच्या रस्त्यावरून छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात आंदोलन एकत्र येत आहेत. 

एक मराठा लाख मराठा, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत मराठा समाज बांधव छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर मनोज जरांगे - पाटील यांच्या प्रतीक्षेत बसले आहेत.

काही वेळातच मनोज जरांगे - पाटील यांच्या सभेस प्रारंभ होणार आहे. त्याकरिता छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक आणि परिसरातील २०० मीटरपर्यंत रस्त्यांवर ठीकठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. गेल्या एक तासापासून येथील गर्दीमध्ये वाढ होत आहे.