कोटक म्युच्युअल फंडची सोलापूरात नवीन शाखा

म्युच्युअल फंडाला मिळतेय सोलापूरकरांची पसंती

कोटक म्युच्युअल फंडची सोलापूरात नवीन शाखा

सोलापूर : प्रतिनिधी

कोटक म्युच्युअल फंडतर्फे (केएमएफ) सोलापूर येथे नवीन शाखा सुरू करण्याविषयीची घोषणा करण्यात आली. याबाबत कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंट कंपनीचे राष्ट्रीय प्रमुख मनीष मेहता (विक्री, विपणन आणि डिजीटल बिझनेस) यांनी पत्रकार परिषदेत दिली. दुकान क्र. २ आणि ३, तळमजला, अद्वैत अपार्टमेंट, नवल पेट्रोल पंपजवळ, सोलापूर येथे ही नवी शाखा सुरू करण्यात आली आहे. 

कोटक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुंतवणुकदारांना सुलभतेने उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. कोटक म्युच्युअल फंडाच्या विविध गुंतवणुकीच्या उपायांची माहिती मिळवण्यासाठी गुंतवणूकदार शाखेला भेट देऊ शकतात. तसेच त्यांना आमच्या तज्ज्ञ गटाकडून वैयक्तिक सहाय्य मिळवता येईल, असेही श्री. मेहता यांनी याप्रसंगी सांगितले.

सोलापूरचे उद्योगविषयक मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (इंडस्ट्री एयूएम) ३ हजार ५०० कोटींहून अधिक आहे आणि लाईव्ह एसआयपी काऊंट १ लाख ५० हजारपेक्षा अधिक आहे. सोलापूरातील गुंतवणुकदारांमध्ये म्युच्युअल फंड तसेच सिस्टमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी) विषयी लोकप्रियता वाढत आहे.

कोटक म्युच्युअल फंड एक प्रभावी गुंतवणूक साधन म्हणून एसआयपीचा सक्रियपणे प्रचार करत आहे. ज्यामुळे गुंतवणुकदारांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांची शिस्त आणि नियमित गुंतवणुकीसह नियोजन करता येते. कंपनी म्युच्युअल फंड योजनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देत असल्याचेही श्री. मेहता म्हणाले.

सोलापूर येथे नवीन शाखा सुरू करताना आम्हाला खूप आनंद झाला आहे. महाराष्ट्रात आपल्या अस्तित्वाचा विस्तार करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणावे लागेल. आम्ही कोटक म्युच्युअल फंडात सक्रियपणे एसआयपीसाठी प्रचार करत आहोत, ज्याने गेल्या काही वर्षांपासून लोकप्रियता मिळवली आहे. अस्थिरतेच्या काळातही, SIP नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणुकदारांसाठी संतुलित फायदा प्रदान करते. 

गुंतवणुकदारांना आमच्या सध्याच्या कोणत्याही योजनांमधून निवड करणे शक्य आहे, तसेच त्यांना SIP च्या माध्यमातून गुंतवणूक सुरू करता येते. आमचा उद्देश गुंतवणुकदारांना म्युच्युअल फंड उत्पादने आणि सेवांच्या सर्वसमावेशक श्रेणीत सहज प्रवेश प्रदान करण्याचा आहे.
 
कोटक म्युच्युअल फंडच्या या शाखा विस्तारात आणखी एक भर म्हणजे www.kotakmf.com या त्यांच्या वेबसाईटचा कायापालट करण्यात आला. ज्यायोगे वितरक आणि क्लाएंटना पोर्टफोलियोची सविस्तर माहिती, तज्ज्ञ ब्लॉग, व्हीडिओ आणि ऑनलाईन व्यवहार सुविधा सहज उपलब्ध होतील. कोटक बिझनेस हब, वितरकांसाठी एक समर्पित पोर्टल, भागीदारांच्या व्यवसाय प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी क्लायंटची माहिती, सहयोगी ब्रँड विपणन सामग्री आणि विश्लेषणात्मक साधनांना परवानगी देते. तसेच, कोटक म्युच्युअल फंडच्या प्रोस्टार्ट ऑनलाइन प्रशिक्षण उपक्रमाला वितरण भागीदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ज्यामध्ये आर्थिक नियोजन, निश्चित उत्पन्न बाजार आणि इतर गुणात्मक विषय कोटक प्रोस्टार्ट या YouTube चॅनेलवर उपलब्ध समाविष्ट आहेत, असे याप्रसंगी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेस गौरव गुप्ता, नितीन साळवी आदी उपस्थित होते.