कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन
महिना अखेरची मुदत
सोलापूर, दि.13 : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरुष/स्त्री/ एकूण (त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1) अशी माहिती सेवायोजन कार्यालयास 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.
माहितीचा उपयोग योजनाबद्ध आर्थिक विकासात निरनिराळे प्रकल्प तयार करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी, आवश्यक मनुष्यबळाचा अंदाज घेण्यासाठी सेवायोजन कार्यालयाला होत असतो. ही माहिती महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडे दर तिमाहीस पाठविली जाते.
त्रैमासिक विवरणपत्र (ई.आर-1) 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे. या वेबपोर्टलवर त्रैमासिक विवरण प्रत्येकी तिमाहीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड यांचा वापर करावा. प्रत्येक नोंदणीकृत आस्थापनेस युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच दिलेला आहे. त्याचा वापर करुन कर्मचाऱ्यांची माहिती तत्काळ भरून पाठवावी.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर 0217-2622113/2722116, इमेल-solapurrojgar@gmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.