मनीष देशमुखांनी दिल्या नुकसानग्रस्त गावांना भेटी
शेतकऱ्यांची केली विचारपूस
सोलापूर : प्रतिनिधी
भाजपाचे नेते मनिष देशमुख यांनी दक्षिण तालुक्यातील गावांना भेट देत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. गावातील कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी देशमुख यांनी तातडीने त्याची निवार्याचीही व्यवस्थाही उपलब्ध करून दिली.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण तालुक्यातील गावातील अनेक शेतकर्यांचे शेती, घरांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मनिष देखमुख यांनी तालुक्यातील खानापूर, कुसुर, तेलगाव, कारकल, लवंगी, भंडारकवठे आदी भागात जाऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. अनेक महिलांना शेताचे व घरांचे नुकसान झाल्याचे सांगताना अश्रू अनावर झाले होते. यावेळी महिलांना व येथील नागरिकांना देशमुख यांनी धीर दिला. त्यांची विचारपूस केली व त्यांना निवार्यासाठी ताडपत्रीची व्यवस्था करून दिली.
यावेळी भाजपा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, यतीन शहा, महेश बगले, पंचायत समिती सदस्य महादेव कमळे, जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील, प्रभाकर बिराजदार आदी उपस्थित होते.
----
वाचा महाबातमी
पुरुषोत्तम कारकल
९८६०८२२२८३