सोलापूरच्या अभियंत्याने सर केला हिमलायीन रूपीन पास

खडतर वातावरणात १५ हजार १९६ फूट उंच पर्वत माथा सर

सोलापूरच्या अभियंत्याने सर केला हिमलायीन रूपीन पास

सोलापूर: प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज कि जय, भारत माता कि जय म्हणत तिरंगा फडकावत हिमालयीन रुपीन पासचा ऑफिशिअल समीटसोलापूरचे महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत यांनी यशस्वी पूर्ण केला. सदर गिर्यारोहणाची नोंद इंडियन मॉऊटेनेरिंग फेडेरेशन घेतली आहे. 

रुपीन पास' हा भारतातल्या अत्यंत अवघड अशा पहिल्या दहा ट्रेकमध्ये समाविष्ट आहे. हा आंतरहिमालयीन ट्रेक असून त्याची सुरवात उत्तराखंड या राज्यातून होते आणि हिमाचल प्रदेशात तो समाप्त होतो.

समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार २४६ मीटर  (१५ हजार १९६ फूट) उंच पर्वत माथा असलेला रुपीन पासचा ट्रेक हा अत्यंत रम्य आहे. परंतु तितकाच अवघड ट्रेक असून, त्यामध्ये निसर्गाची विविध रूपं बदलणारं हवामान यांचं दर्शन होतं. रुपीन पासचा ट्रेक हा शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक शक्तीचाही कस पाहणारा असतो.

कधी साधा पाऊस तर कधी गारांचा , बर्फाळ वारे आणि अधूनमधून उन्हाळ्याची हुलकावणी देणारं ऊन, बर्फाळ कडे अशा खडतर वातावरणाचा सामना करत महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत आणि त्यांच्या सवंगड्यानी येथील शिखरांवर यशस्वी चढाई केली. 

सदर गिर्यारोहणाची सुरवात उत्तराखंड मधील धौला - सेवा मार्गे हिमाचल मधील झाका-जिसकून-बुरास कांडी-धांदेरास थच- अप्पर वॉटर फॉल ते रुपीन पास सर करून रोंटी गड-सांगला व्हॅली येथे पूर्ण झाला. बेस कॅम्प पासून चढाई करण्यासाठी २२ मे ते २९ मे असा सुमारे सात दिवसांचा कालावधी लागला. या समूहाच्या यशस्वीते बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
---------------------
शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारं, प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्यास शिकवणारं हे गिर्यारोहण होते. यामुळे मानवाला निसर्गासमोरचं त्याचं क्षुद्रत्व जाणवते. तसेच त्याला निसर्गासमोर नतमस्तक होण्यास भाग पाडते. 
- अमेय केत (उपकार्यकारी अभियंता महापारेषण)